Pune : ‘कोरोना’ विषाणूचे पुण्यात शंभर रुग्ण; 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात ‘कोरोना’चे रुग्ण झपाट्याने वाढत असून, शंभरी रुग्ण पार झाले आहे. 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज पुणे शहरात तब्बल 17 रुग्ण वाढले. जिल्ह्यात एकुण 103 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. मार्केट यार्डमध्ये भाजीपाला खरेदीसाठी अजूनही लोक लहान मुलांनाही घेऊन येत आहेत.

जवळपास 5 हजार रुग्ण कोरोंटाईन आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लोकडाऊन जाहीर केला आहे. अजूनही 10 दिवस हा लोकडाऊन चालणार आहे. त्याला पुणेकरांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.