Crime News : महिलेवर पाळत ठेऊन तिला त्रास देणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  महिलेवर पाळत ठेऊन तिला विविध मार्गाने सतत त्रास देणाऱ्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 एप्रिल ते 25 जून या कालावधीत घडला आहे.

 

अनुपम उत्तमकुमार देसाई (रा.मलाड, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत महिलेने सोमवारी (दि.25)  हिंजवडी पोलीसात तक्रार दिली आहे.

 

Pune News : शहर खड्ड्यात गेल्यानंतर महापालिकेला जाग, 11 ठेकेदारांना नोटीसा

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पूर्वी वाकड येथे रहात होता. तेंव्हापासून तो फिर्यादी महिलेवर पाळत ठेवून होता. पाठलाग करून, पाळत ठेऊन त्याने फिर्यादिची माहिती काढली.यावेळी त्याने गुगल पे वरून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीतही फोन करून तेथील कर्मचाऱ्यांकडून फिर्यादिची माहिती काढली. तसेच त्यांना फोनवरून चुकीची माहिती देऊन बदनाम केले.

 

Pune Crime News : पुण्यातील नाना पेठेत तरुणाचा चाकूने भोसकून खून, मध्यरात्री घडला थरार

 

फिर्यादीने त्याला जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.