Pratibha School : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलचा सी.बी.एस.ईचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज – प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर महाविद्यालयाचा दहावी व बारावीचा 2022 सालचा सीबीएसईचा निकाल हा 100 टक्के लागला आहे.

 

यात शाळेच्या दहावीतील अक्षत बांगल या विद्यार्थ्याने 98.6 टक्के घेत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याबरोबरच अदिती सिंग हिला 98.4 टक्के, देविका चौधरीला 96 टक्के मिळवित त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच अनुष्का लाकडे 95.8 टक्के, तनिष्का लोहिया 95.8 टक्के यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेतील 15 विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

 

तर 12 वीमध्ये शिखर मुंदडा या विद्यार्थ्याने 96.2 टक्के घेत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर तन्मय विश्वासराव याला 95.6 टक्के, सुचिर गुप्ता ला 95 टक्के गुण मिळवून  द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तर अनुष्का दिधिच ला 94.6 टक्के, आकांक्षा मोहंती ला  94 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. बारावीत 17 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहे.

 

 

 

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. दिपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, विद्यालयाचे प्राचार्या सविता ट्रंव्हिस व शिक्षकांनी कौतुक करत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.