Pune Crime News : उत्तर प्रदेशातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आमदाराच्या मुलाला पुण्यातून अटक

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशातील एका सामूहिक बलात्कार प्रकरणात मागील वर्षभरापासून फरार असणाऱ्या समाजवादी पक्षाच्या एका आमदाराच्या मुलाला पुण्यातून अटक (Pune Crime News) करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. हडपसर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. आरोपीची माहिती देणाऱ्यांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.  

 

विष्णू विजय मिश्रा (वय 34) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील विजय मिश्रा हे उत्तर प्रदेशातल्या भदोलीचे आमदार होते. गेल्या वर्षी एका सामूहिक बलात्कार प्रकरणी तो पोलिसांना पाहिजे होता. जवळपास एक वर्षापासून तो फरार होता. दरम्यान मिश्राचे काही नातेवाईक पुणे शहरात (Pune Crime News) राहत असल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार दहा दिवसांपूर्वी विशेष तपास पथकाचे काही कर्मचारी पुण्यात दाखल झाले होते. आरोपी विषयी माहिती गोळा केली जात होती. त्यानंतर हडपसर पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.

 

Pune Crime News : पुण्यातील नाना पेठेत तरुणाचा चाकूने भोसकून खून, मध्यरात्री घडला थरार

 

अटक केल्यानंतर विष्णू मिश्रा याला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे न्यायालयाने त्याला प्रवासी कोठडी केली. त्याला घेऊन विशेष पथकाचे कर्मचारी उत्तर प्रदेशाला रवाना झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.