Pune News : शहर खड्ड्यात गेल्यानंतर महापालिकेला जाग, 11 ठेकेदारांना नोटीसा

एमपीसी न्यूज – सध्या पुणे शहरातील प्रत्येक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येईल. जागोजागी पडलेल्या या खड्ड्यांमुळे पुणेकरांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. अपघात होऊन काही नागरिक जखमी झाले तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. माध्यमातून याविषयी वारंवार  (Pune News) आवाज उठवल्यानंतर आता पुणे महापालिकेला जागा आली आहे. 45 रस्त्यांच्या सर्वेक्षणात खड्डे आढळलेल्या 11 ठेकेदारांना पुणे महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.

 

शहरात सातत्याने खोदकाम सुरू असते. तसेच समान पाणीपुरवठा आणि ड्रेनेजसाठी केलेल्या कामामुळे ही शहरातल्या अनेक भागात खड्डे पडले होते. हे सर्व खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यातही आले होते. मात्र हे खडे व्यवस्थित न केल्याने अपघात होत असून वाहतूककोंडी ही होत होती. सर्वसामान्य पुणेकरांना (Pune News) त्याचा मोठा मनस्ताप होत होता. त्यामुळे खड्ड्यांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारच्या तक्रारी महापालिकेच्या हेल्पलाइनवर सातत्याने येत होत्या. त्यानंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

 

 

 

महापालिका प्रशासनाने दायित्व असलेल्या रस्त्यांचा अहवाल पथ विभागाकडून मागवला. तसेच रस्त्यावर खड्डे आढळल्यास संबंधित ठेकेदाराकडून हे खड्डे दुरुस्त करून घेण्याचा आणि दुरुस्त न झाल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला होता. सुरुवातीला महापालिकेच्या पत विभागाने दायित्व असलेल्या 120 रस्त्यांची यादी (Pune News) तयार केली होती. या रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेने एका त्रयस्थ संस्थेला दिले आहे. या पथकाने आतापर्यंत 45 रस्त्यांची पाहणी केली.

 

 

Pune News : ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडूनही श्रीमंत दगडूशेठ गणपतीची महाआरती, पण का? 

 

यामध्ये अकरा रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदारांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. तसेच लवकरात लवकर हे रस्ते योग्य पद्धतीने पूर्वत केले नाही तर संबंध ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.