Pimpri chinchwad news : जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या जनावर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या जनावर मालकांच्या विरुद्ध पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पहिला गुन्हा दाखल केला असल्याचे मंचक इप्पर पोलीस उपयुक्त परिमंडळ एक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले की पहिला गुन्हा 17 ऑक्टोबर रोजी अज्ञात जनावर मालकाचे विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुणे नाशिक रोडवर, चांदणी चौक राजमाता जिजाऊ उडान पूल भोसरी येथे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे फिरताना मिळाली. या जनावरांमुळे सर्वसामान्य लोकांना उपद्रव होईल रोगराई पसरेल याची शक्यता आहे. तसेच सध्या महाराष्ट्र राज्यात जनावरांमध्ये लंपी स्कीन संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

या आजाराने मोठ्या प्रमाणात जनावरे बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहेत. आपल्या अशा तृतीयांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना व सार्वजनिक रधारीत अडथळा होऊन वाहनाचा अपघात होऊन गंभीर दुखापत होऊन जीवित हानी होऊ शकते. हे माहीत असताना कोणीतरी अज्ञात जनावर मालकाने त्याची जनावरे रस्त्यावर मोकाट सोडून शासनाने संसर्गजन्य रोगाचे अनुषंगाने केलेल्या नियम व कायदे संदर्भात जागी करण्यात आलेल्या आदेशांचा भंग केलेला आहे.
असे कृत्य करणाऱ्या लोकांना प्रतिबंध व्हावा त्यांना जरा बसावा तसेच सर्वसामान्य लोकांची हीच लक्षात घेऊन अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, मंचक इप्पर, पोलीस उप आयुक्त, डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोसरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर 17 रोजी भा.द.वि कलम 269 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 106/ 117 प्रमाणे अज्ञात जनावर मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार भोसले पोलिस हवालदार चपटे हे करीत आहेत. या गुन्ह्यातील अज्ञात जनावर मालकांचा भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस शोध घेत आहेत. तसेच असे कृती करणाऱ्या इसमांना  लवकरात लवकर अटक केले जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.