Heavy vehicle : पुणे- अहमदनगर व शिक्रापूर- चाकण रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज : शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीत पुणे- अहमदनगर व शिक्रापूर- चाकण रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. (Heavy vehicle) या मार्गांवर जड वाहनांची वाहतूक 21 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत बंद असणार आहे.

डॉ. राजेश देशमुख जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी पुणे यांनी मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार व शासन गृह विभागाचे 19 मे 1990 च्या अधिसुचनेनुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे अहमदनगर व शिक्रापूर चाकण रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 7 वा. ते 11 वा. तसेच सायंकाळी 4 ते 8 वा पर्यंतच्या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक 21 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत प्रायोगिक तत्वावर बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.

 

 अवजड वाहनांवर बंदी घालण्याचे कारण 

पुणे अहमदनगर महामार्गावर 20 किलोमीटर तसेच शिक्रापूर- चाकण मार्गावरील 9 किलोमीटर भागात मोठ्या प्रमाणात रोड लगत गोडाऊन, हायस्कूल, कॉलेज, मंगल कार्यालय,(Heavy Vehicle) हॉस्पिटल तसेच एम.आय.डी.सी क्षेत्र असून या भागात ठिकठिकाणी रोड क्रॉसिंग आहेत. पुणे अहमदनगर रोड हा कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी या गावांच्या हद्दीतून जात आहे.

चाकण व रांजणगाव एमआयडीसी कडून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने या भागात रोडवर येत असतात. त्याचप्रमाणे स्कूल बसेस मधून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वरदळ होत असते.(Heavy vehicle) तसेच रांजणगाव व चाकण एमआयडीसी येथे जाणारे मालक व कामगार वर्ग यांच्या बसेस व खाजगी वाहनांची या वेळेत मोठ्या प्रमाणावर ये- जा होत असते. त्यामुळे या भागात अवजड वाहनांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने अपघात होत असतात.

Pimpri chinchwad news : जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या जनावर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल

त्यामुळे पुणे- नगर रोडवर नेहमी वाहतूक कोंडी होऊन बाहेर गावी जाणाऱ्या व स्थानिक लोकांची गैरसोय होते. तसेच अपघाताच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो.(Heavy Vehicle) त्यामुळे उपाययोजना म्हणून अवजड वाहनांची वाहतूक सकाळी 7 ते 11 वा पर्यंत तसेच सायंकाळी 4 ते 8 वा. पर्यंत या वेळेत पुणे- अहमदनगर व शिक्रापूर- चाकण रोडवर बंद करण्यात यावी, याबाबत डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.