Ganesh Bidkar : ढगफुटी सदृश पाऊस हा विषय राजकारणाच्या पलिकडचा – गणेश बिडकर

एमपीसी न्यूज – ढगफुटी सदृश पाऊस हा जागतिक हवामान बदलाचा परिणाम आहे. हा विषय राजकारणाच्या पलीकडचा असून त्यावर संघटितपणे विचारविनिमय करून कृती कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे, असे मत पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

पुणे शहरात गेल्या काही वर्षात काही तासात अभूतपूर्व पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे, ही वस्तुस्थिती हवामान विभागाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर दिसून येते. हवामान बदल हा पुण्यासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठीच मोठे आव्हान बनलेले आहे. होणारा पाऊस हा या हवामान बदलाचाच फटका आहे आणि त्याच्याशी एकजुटीने संघर्ष करण्याची जशी आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

हवामान बदलाच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना काय करता येतील यासाठी गंभीरपणे विचारविनिमय करून कृती कार्यक्रम आखला गेला पाहिजे. यासाठी जगभर तज्ज्ञ विचार करताहेत आणि त्या आघाडीवर जे जे निष्कर्ष काढले जाताहेत आणि काढले जातील, याचा विचार आपणही कृतीत आणायला हवा, हीच आमची प्रामाणिक भावना आहे. हा विषय राजकारणाच्या पलिकडचा आहे, हे सर्वप्रथम समजावून घेतले पाहिजे, अशी कळकळीची विनंती त्यांनी सर्वंच राजकीय पक्षांना केली.

PIL on water issue : पिंपरी-चिंचवड,पुणे महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सोसायट्यांच्या पाणी प्रश्नावरील जनहित याचिकेवर 29 नोव्हेंबर पर्यंत मत मांडण्याचे हायकोर्टाचे निर्देश

17 ऑक्टोबरला पडलेल्या पावसाची सरासरी 86.85 होती. तर शिवाजीनगर आणि हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनुक्रमे 105 व 124.19 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.(Ganesh Bidkar) 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुण्यातील रस्त्यांची लांबी 1400 किलोमीटर आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे 672 किलोमीटरचे रस्ते 9 मीटर किंवा त्यापेक्षा कमी रूंदीचे आहेत. 9 ते 12 मीटर रूंदीचे 298 किलोमीटर रस्ते आहेत. 12 ते 24 मीटर रूंदीचे 315 किलोमीटर रस्ते आहेत.

पुण्यातील स्टार्म वॉटर वाहिन्यांची वहन क्षमता 55 मिलीमीटर इतकी आहे. या संदर्भात कालच महापालिका आयुक्तांनी तपशिल सादर केलेले आहेत. पुणे शहराच्या जुन्या हद्दीत एकूण 214 मुख्य व उपनाले आहेत. त्यांची एकूण लांबी 362 किलोमीटर आहेत. तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांत 164 मुख्य व उपनाले आहेत. त्यांची लांबी 165 किलोमीटर इतकी आहे. (Ganesh Bidkar) पुणे शहरात 12 मीटर व त्यापुढील रूंदीच्या रस्त्यांवर अंदाजे 228 किलोमीटर लांबीची पावसाळी लाईन असून त्यावर 30 हजार 391 चेंबर्स आहेत. 17 आक्टोबरला झालेल्या पावसामुळे शहरात पाणी साठण्याच्या 57 घटना घडल्यात. यात इमारती आणि सोसायट्यांत पाणी शिरण्याच्या 42 घटना घडल्यात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.