Talegaon Accident : तळेगाव दाभाडे येथे स्कूल बसखाली चिरडून ज्येष्ठ महिला मृत्युमुखी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे स्कूल बसखाली चिरडून (Talegaon Accident) एका ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास वैद्य कॉलनीच्या रस्त्यावर हा अपघात झाला.

सुलोचना देसाई (वय 82) असे अपघातात मरण पावलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी स्कूलबसचा चालक राजेंद्र शेडगे (वय 35) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मारुती मदेवाड म्हणाले की, याप्रकरणी (Talegaon Accident) स्कूलबस ड्रायव्हर राजेंद्र शेडगे वय 35 वर्षे रा. तळेगाव दाभाडे या आरोपीस अटक करण्यात आले आहे. त्याच्यावर भा.द.वि कलम 304 (अ) अन्वये तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात कसा घडला?

सकाळी भजनासाठी गेलेल्या सुलोचना देसाई या वैद्य कॉलनीतील परमार्थ निकेतन मंदिराकडून मारुती मंदिराकडे पायी जात असताना सकाळी 7.50 च्या सुमारास त्यांना स्कूल बसची (Talegaon Accident) मागून धडक बसली. त्या खाली पडल्या असताना बसच्या चाकाखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Heavy vehicle : पुणे- अहमदनगर व शिक्रापूर- चाकण रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी

स्कूल बसमध्ये विद्यार्थी प्रवास करत होते. या विद्यार्थ्यांची आज परीक्षा असल्याने बस चालक शेडगे याने अपघातानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रथम त्यांच्या शाळेत सोडले. त्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

तळेगाव पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.