Pimpri : निगडीतील एका नगरसेवकाला डेंगीची लागण

शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूसह डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. निगडीतील एका नगरसेवकाला डेंगीची लागण झाली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. नगरसेवकाला डेंगीची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला असतानाच डेंगीने पुन्हा डोके वर काढले आहे. जानेवारी  महिन्यात तीन, ऑगस्टमध्ये 53 आणि चालू महिन्यात तब्बल 26 अशा एकूण डेंगीचे 87 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर,  गेल्या नऊ महिन्यात स्वाईन फ्ल्यूने 20 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निगडीतील एका नगरसेवकाला तीन दिवसांपुर्वी डेंगीची लागण झाली आहे. त्यांचे प्लेटलेट्स कमी झाले असून त्यांच्यावर चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डेंगी, स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. परंतु, नगरसेवकाला डेंगीची लागण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.