A Day before Palkhi in Alandi : माऊलींच्या पालखी सोहळ्याची पूर्वसंध्या आणि कोरोनाचे मळभ!

A Day before Palkhi in Alandi: On the eve of Mauli's Palkhi ceremony there was Corona's dirt in the sky मुक्त वृत्त छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी याही वर्षी पालखी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आळंदीत धाव घेतली पण... अनुभवलं ते वेगळंच अभूतपूर्व वास्तव.... आळंदीवर पसरलेलं कोरोनाचं मळभ!

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा म्हणजे अलंकापुरी आळंदीतील आनंदोत्सवच! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून गोळा होणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्याने फुलून जाणारा इंद्रायणीचा घाट, दुमदुमणारे टाळ-मृदुंग, हरीनामाचा अखंड गजर, भाविकांच्या गर्दीने फुललेली आळंदीची बाजारपेठ, विठुरायाच्या भेटीच्या ओढीने सुरू असलेली वारकऱ्यांची लगबग, अनुपम असा हा भक्तीसोहळा डोळ्यात साठवून ठेवावा आणि माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवून धन्य धन्य व्हावं…. हा दरवर्षीचा अमृतानुभव यंदा मात्र कोरोना नावाच्या अतिसूक्ष्म विषाणूने हिरावून घेतला…

मुक्त वृत्त छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी याही वर्षी पालखी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आळंदीत धाव घेतली पण… अनुभवलं ते वेगळंच अभूतपूर्व वास्तव…. आळंदीवर पसरलेलं कोरोनाचं मळभ… निर्मनुष्य रस्ते…. नीरव शांतता… जणू अघोषित संचारबंदीच… ओस पडलेला इंद्रायणी काठ… तो देखील पालखी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला… डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता… पण कॅमेरा आळंदीतील पालखी सोहळ्याची ही ‘न भूतो, न भविष्यति’ अशी पूर्वसंध्या टिपत होता. माऊलींच्या समाधी मंदिराच्या बंद असलेल्या महाद्वारासमोर माथा टेकवला आणि एकच मागणं मागितलं… उद्या माऊलींच्या पालखीबरोबरच हा महाद्वारातून ऊर्जेचा महास्रोत बाहेर यावा आणि कोरोनाचं मळभ दूर होऊन पुन्हा आकाश मोकळं व्हावं… कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नवं बळ…. नवसंजीवनी मिळून या विश्वातील समस्त जीवांचं कल्याण व्हावं…

सर्व छायाचित्रे – देवदत्त कशाळीकर, मुक्त वृत्तछायाचित्रकार

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.