Corona World Update: कोरोनामुक्तांच्या प्रमाण 51.16 टक्क्यांपर्यंत वाढ, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 43.83 टक्के!

Corona World Update: Corona-free ratio rises to 51.16 per cent, active patients rise to 43.83 per cent! एका दिवसात कोरोनाचे विक्रमी 1 लाख 40 हजार 917 नवे रुग्ण, कोरोनाचा मृत्यूदर मात्र 5.53 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 77 लाखांच्या पुढे गेला असला तरी त्यापैकी 39 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आणखी वाढून 51.16 टक्के झाली आहे.  आता जगात सुमारे 33 लाख सक्रिय कोरोनाबाधित उरले आहेत. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.53 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 43.29 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) एका दिवसात तब्बल 1 लाख 40 हजार 917 नव्या रुग्णांची भर पडली. नव्या रुग्णांची संख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 77 लाख 32 हजार 485 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 28 हजार 236 (5.53 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 39 लाख 56 हजार 272 (51.16 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 33 लाख 47 हजार 977 (43.29 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 32 लाख 94 हजार 090 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 887 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

5 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 529,  कोरोनामुक्त 89 हजार 947, मृतांची संख्या 4 हजार 906

6 जून – नवे रुग्ण 1 लाख 26 हजार 715,  कोरोनामुक्त 75 हजार 764, मृतांची संख्या 4 हजार 177

7 जून – नवे रुग्ण 1 लाख 13 हजार 417,  कोरोनामुक्त 48 हजार 619, मृतांची संख्या 3 हजार 385

8 जून – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 270,  कोरोनामुक्त 75 हजार 280, मृतांची संख्या 3 हजार 157

9 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 071,  कोरोनामुक्त 66 हजार 534, मृतांची संख्या 4 हजार 732

10 जून – नवे रुग्ण 1 लाख 34 हजार 705,  कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 298, मृतांची संख्या 5 हजार 165

11 जून – नवे रुग्ण 1 लाख 36 हजार 757,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 127, मृतांची संख्या 4 हजार 951

12 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 917,  कोरोनामुक्त 86 हजार 241, मृतांची संख्या 4 हजार 603

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 21 लाखांवर

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (शुक्रवारी) 27 हजार 221 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 16 हजार 922 झाली आहे. शुक्रवारी 791 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 16 हजार 825 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 8 लाख 41 हजार 934 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ब्राझीलमध्ये एका दिवसात 843 कोरोना बळी

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 843 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 41 हजार 901 जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 8 लाख 29 हजार 902 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 3 लाख 96 हजार 692 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 91 हजार 309 आहे.

मेक्सिकोतील कोरोना बळींच्या संख्येबाबत चिंता

मेक्सिकोमध्ये कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या वाढल्याने देशातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारी मेक्सिकोत 587 कोरोना बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे त्या देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 15 हजार 944 वर जाऊन पोहचला आहे. मेक्सिकोत आतापर्यंत 1 लाख 33 हजार 974 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 98 हजार 064 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

भारतात एका दिवसांत 389 कोरोना बळी

भारतात शुक्रवारी एका दिवसात 389 कोरोना बळींची नोंद झाली आहे. चिलीमध्ये 222, इंग्लंडमध्ये 202, पेरूमध्ये 199, रशियात 183, इक्वाडोरमध्ये 108 तर पाकिस्तानात 107 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये 75, दक्षिण अफ्रिकेत 70, कोलंबिया 57, इटलीत 56 तर कॅनडात 55 कोरोना बळी गेले आहेत.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 21,16,922 (27,221), मृत 1,16,825 (+791)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 8,29,902 (+24,253), मृत 41,901 (+843)
  3. रशिया – कोरोनाबाधित 5,11,423 (+8,987), मृत 6,715 (+183)
  4. भारत – कोरोनाबाधित 3,09,603 (+11,320) , मृत 8,890 (+389)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,92,950 (+1,541), मृत 41,481 (+202)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,90,289 (+502), मृत 27,136 (+0)
  7. इटली – कोरोनाबाधित 2,36,305 (+163), मृत 34,223 (+56)
  8. पेरू –  कोरोनाबाधित 2,20,749 (+5,961) , मृत 6,308 (+199)
  9. जर्मनी – कोरोनाबाधित 1,87,251 (+456), मृत 8,863 (+12)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,82,525 (+2,369), मृत 8,659 (+75)
  11. टर्की – कोरोनाबाधित 1,75,218 (+1,195), मृत 4,778 (+15)
  12. चिली – कोरोनाबाधित 1,60,846 (+6,754), मृत 2,870 (+222)
  13. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,56,287 (+726), मृत 29,374 (+28)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,33,974 (+4,790), मृत 15,944 (+587)
  15. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,25,933 (+6,397), मृत 2,463 (+107)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,19,942  (+3,921) मृत 893 (+36)
  17. कॅनडा –  कोरोनाबाधित 97,943 (+413), मृत 8,049 (+55)
  18. चीन – कोरोनाबाधित 83,064 (+7), मृत 4,634 (0)
  19. बांगलादेशकोरोनाबाधित 81,523 (+3,471), मृत 1,095 (+46)
  20. कतार – कोरोनाबाधित 76,588 (+1,517), मृत 70 (+1)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.