Bhosari : कंपनीच्या आवारातून डायकास्टिंग मशीन चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या आवारात ठेवलेला नादुरुस्त डाय कास्टिंग मशीनचा 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा पार्ट चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) दुपारी बाराच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली.

प्रवीण वसंत लोंढे (रा. भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीमध्ये प्रवीण यांची प्रवीण इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. कंपनीच्या जनरल ब्लॉक येथे नादुरुस्त डाय कास्टिंग मशीन ठेवली आहे. बुधवारी (दि. 4) सायंकाळी सात ते शुक्रवारी (दि. 6) दुपारी बारा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा मशीनचा अर्धा पार्ट चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.