Pimpri : कंपोस्टींग खत प्रकल्प नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून 20 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – कंपोस्टींग खत प्रकल्प नसलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल व्यावसायिकांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. आज (बुधवारी) दोन गृहनिर्माण सोसायट्या, चार हॉटेल यांच्यांकडून प्रत्येक पाच हजार रुपये अशा 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार शहरातील मोठ्या प्रमाणावर कचरा उत्पन्न करणा-या आस्थापनांनी ओल्या कच-याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात कचरा उत्पन्न करणा-यांना कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नोटीस देऊन देखील ज्यांनी कंपोस्टींग यंत्रणा सुरु केली नाही. त्यांच्यावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या ‘स्वप्ननगरी’, ‘आशा’ या दोन गृहनिर्माण सोसायट्यांकडून प्रत्येक पाच हजार रुपये असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत हॉटेल कलासागर, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील हॉटेल अॅबीयन्स, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील हॉटेल डबल ट्री आणि हॉटेल सप्तगिरी अशा चार हॉटेलकडून प्रत्येकी पाच हजार रुपये असा 20 हजार रुपयांचा तर एकूण 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.