PCMC News : ‘प्लॅस्टिक पिशव्या, सॅनिटरी पॅडस्, रॅपर्समुळे ड्रेनेज लाईन होताहेत चोकअप’

एमपीसी न्यूज – किचन, बाथरुममधील वापरलेल्या पाण्याशिवाय प्लॅस्टिक पिशव्या, वापरलेले सॅनिटरी पॅडस्, रॅपर्स, कपडे, लाकडे, बाटल्या ड्रेनेज लाईनमध्ये येतात. परिणामी, ड्रेनेज लाईन चोकअप होतात. त्यामुळे मैला सांडपाणी रस्त्यावर पसरते. नागरिकांच्या घरात जाते. (PCMC News) अनारोग्यकारक स्थिती निर्माण होते. ड्रेनेज मॅनहोल चेंबर्स फुटतात. नाल्यांद्वारे मैला सांडपाणी नदीत मिसळून नदी प्रदुषित होते. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागावे. प्लॅस्टिक पिशव्या, वापरलेले सॅनिटरी पॅडस्, रॅपर्स, कपडे ड्रेनेज लाईनमध्ये टाकू नयेत असे आवाहन जलनि:सारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी केले.

महापालिकेमार्फत वापरलेले (मैला सांडपाणी) एकत्र करुन मलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ड्रेनेज लाईन्समधून वहन केले जाते. मलशुद्धीकरण केंद्रात या मैला सांडपाण्यावर प्रक्रीया केली जाते. ते पाणी नदीत सोडण्यात येते. रहिवाशी मिळकती, गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक मिळकती यांचे ड्रेनेज कनेक्शन ड्रेनेज लाईन्सला जोडण्यात आलेली आहेत. किचन, बाथरूम, बेसिन, बाथरुममध्ये वापरलेले एवढेच पाणी ड्रेनेज कनेक्शनमधून पालिकेच्या ड्रेनेज लाईनला येणे गरजेचे असते. पण, यासोबत वापरलेले सॅनिटरी पॅडस्, प्लॅस्टिक पिशव्या, रॅपर्स, कपडे, लाकडे, बाटल्या ड्रेनेज लाईनमध्ये येतात. यामुळे ड्रेनेज लाईन चोकअप होतात. हे टाळण्यासाठी आणि सांडपाणी वहन व्यवस्था कार्यक्षमरित्या चालण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.

Alandi News : अलंकापुरी मध्ये माऊली माऊलीच्या जयघोषाने ,सहस्त्र अश्रूंच्या धारांनी समाधी सोहळा संपन्न

गृहनिर्माण सोसायट्यांनी मैला सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी गाड्या धुण्यासाठी वापरावे. प्रकल्प कार्यरत राहिल, त्याची देखभाल वेळेवर होईल याची काळजी घ्यावी.(PCMC News) ज्या सोसायट्यांचे ड्रेनेज कनेक्शन पालिकेच्या  ड्रेनेज कनेक्शनला जोडले आहे. त्यांनी सोसायटीच्या हद्दीत सेव्हर ट्रॅप बसविल्याची खात्री करावी. सोसायटी, चाळीतील पावसाचे पाणी जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. कोणत्याही परिस्थिती पावसाचे पाणी ड्रेनेज लाईनला जोडू नये.

घनकचरा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावे. कोणताही घनकचरा ड्रेनेज लाईनमध्ये जाणार नाही याबाबत काळजी घ्यावी.  वापरलेले सॅनिटरी पॅड्स, डायपर्स, कापूस, घातक घरगुती कचरा बाथरुम, टॉयलेटद्वारे ड्रेनेजमध्ये टाकू नये. हॉटेल, रेस्टारंटस्, खानावळी, स्वीट मार्ट यांनी खरकटे पदार्थ, तेल, डिटर्जंट वस्तु  ड्रेनेजमध्ये टाकू नयेत. त्यामुळे चोकपचे प्रमाण वाढते. ब-याच ठिकाणी नागरिकांनी त्यांचे  ड्रेनेज कनेक्शन पावसाचे पाणी वाहून नेणा-या लाईनला जोडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी, मान्यताप्राप्त प्लंबर्सच्या माध्यमातून नियमानुसार अर्ज करुन ड्रेनेज कनेक्शन रितसर पालिकेच्या ड्रेनेज लाईनला जोडावे.

गावठाण, दाट लोकवस्तीच्या निवासी भागात, झोपडपट्ट्यांमध्ये घरासमोरच भांडी घासणे, कपडे धुतली जातात. त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोल चेंबरला छिद्र पाडून त्याद्वारे हे पाणी आत टाकतात. त्याद्वारे खरकटे पदार्थ, भाज्यांचे देठ, प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या या वस्तुतही आत टाकल्या जातात. त्यामुळे अशा भागात  ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचे प्रमाण वांरवार होते. त्यामुळे ड्रेनेज मॅनहोलला छिद्र करु नये.(PCMC News) उघडी गटारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात. पण, त्यात प्लॅस्टिक पिशव्या, रबरी वस्तू, चेंडू, दगड आढळतात. काही ठिकाणी उघडी गटारे पालिकेच्या ड्रेनेज लाईनला जोडली आहेत. या वस्तु ड्रेनेज लाईनमध्ये गेल्यामुळे चोकअप होते.

विकसकांकडून घरांचा ताबा घेताना पाणीपुरठा व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था यांचे नकाशे आवर्जुन घ्यावेत. त्यानंतर व्यवस्थांची देखभाल, दुरुस्ती करताना सुलभता येईल असे आवाहन महापालिकेने केले आहे. याबाबत काही तक्रार, सूचना करण्यासाठी जलनि:सारण विभागाच्या [email protected], सारथीच्या 8888006666 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.