Alandi News : अलंकापुरी मध्ये माऊली माऊलीच्या जयघोषाने ,सहस्त्र अश्रूंच्या धारांनी समाधी सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : दि.22 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळ्या निमित्त मंदिरा मध्ये ह भ प नामदास महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. (Alandi News)त्यांनी यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रातील त्यांच्या माता पित्यांचे विविध जीवन चरित्राचे वर्णन केले.

विशेषतः देहांत प्रायश्चित्त वर्णन करते वेळी हजारो भाविकांच्या नयनी अश्रू आले,अंगावर शहारे आले. अंतःकरण उसळून आले.ज्या लहान वयात मुलांचे लाड,कौतुक,हट्ट पुरवायचे असतात त्या वयात त्यांना कायमचे सोडून जाणे.या प्रसंगाचे भावुक असे वर्णन त्यांनी केले.माय मेली बाप मेला आता संभाळी विठ्ठला.(Alandi News) माता पिता कायम चे या जगातून निघून गेल्यावर संत निवृत्ती ,संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत मुक्ताई यांनी आपल्या माता पित्याला या समाजाने दिलेला त्रास व प्रसंग आठवला.तसेच ते गेल्यानंतर  या चार भावंडांना काय त्रास सहन केला याचे वर्णन त्यांनी केले. त्यानंतर ते पैठण ला जाऊन जे त्यांनी काही केले त्यानंतर तेथील लोकांना समजले हे सामान्य नाहीत हे महान आधिकारी आहेत.संत ज्ञानेश्वरांची व या भावंडांची चार ही बाजूला कीर्ती पसरली.

पंढरपूर ला येऊन संत ज्ञानेश्वर यांनी नामदेवा बरोबर देशभर विविध ठिकाणी भ्रमण केले. त्यानंतर परत पंढरपूर ला येऊन संत ज्ञानेश्वर यांनी विठ्ठलाला विनंती केली समाधी घेईन तुझ्या चरणी.परंतु विठ्ठलाने सांगितले तुझे समाधी स्थळ हे अलंकापुरी येथे आहे. तिथे समाधी घ्यावी. त्यानंतर कार्तिकी समाधी सोहळ्या करता अलंकापुरी येथे व्यास,वाल्मिकी, मागील युगातील सत्पुरुष ,ज्ञानदेवांची स्तुती  करण्याकरता सहस्त्र  मुखी शेष नाग,उद्धव, सर्व देव ,ऋषी मुनी उपस्थित होते. विठ्ठलाने विश्वकर्म्यास सर्वांची योग्य अश्या जागी सिद्धेश्वर मंदिरा जवळ मंडपाची ,सोयी सुविधेची व्यवस्था  करण्यास सांगितले .संतांचे सोहळ्या वेळी कीर्तन जागर झाले.पांडुरंगाने त्या चार भावंडांची पूजा केली.

Pune News : अभया-सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल” प्रकल्पाची सुरवात

त्यांचे चरण तीर्थ प्राशन केले.व म्हणाले माझा उद्धार झाला.नामदेवांनी या प्रसंगाचे यथांग असे वर्णन केले. संत ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाते वेळी चे भावुक असे वर्णन करत परत हजारो श्रोत्यांच्या नयनी अश्रू आले.संत ज्ञानेश्वर महाराज समाधी जाते वेळी साक्षात पांडुरंग एका कोपऱ्यात जात त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या जीवनात त्यांना किती त्रास सहन केला त्यांच्या जीवनातील अनेक कठीण प्रसंग आठवत ते नामदेवांना सांगितले व आपल्या उपरण्यांनी स्वतः चे डोळे पुसले.रुक्मिणी ते पाहिले पांडुरंगाची समजूत काढली.व पांडुरंग सावरले. त्यानंतर पांडुरंगाने आपले चरणतीर्थ संत ज्ञानेश्वरास पिण्यास दिले.संत ज्ञानदेवांच्या मस्तकी त्यांनी हात ठेवला .

त्यानंतर ज्ञानदेव  समाधिस्थ अवस्थेत  गेले.समाधी सोहळ्याचे थेट मनाच्या अंतःकरणाला भिडणारे भावुक असे वर्णन ह भ प नामदास महाराजांनी किर्तनात  केले. त्यांनंतर घंटानाद झाला.(Alandi News) माऊलींच्या समाधीवर  पुष्पवृष्टी करण्यात आली.माऊली माऊली नामाच्या जयघोषाने यावेळी मंदिर व परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पा. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,सोहळा मालक आरफळकर,माऊलीं मानकरी योगीराज कुऱ्हाडे पा.राहुल चिताळकर पा.,स्वप्नील कुऱ्हाडे,मुख्याधिकारी अंकुश जाधव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे,आळंदी ग्रामस्थ , आळंदी मधील सर्व पोलीस आधिकारी कर्मचारी , पालिका आधिकारी कर्मचारी वर्ग ,पोलीस मित्र ,आळंदी पंचक्रोशीतील सर्व स्वयंसेवक व मोठ्या संख्येने वारकरी भाविक येथे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.