Pune News : महात्मा फुले मंडईच्या लाकडी छताला लागलेली आग आटोक्यात

0

एमपीसी न्यूज : महात्मा फुले मंडई शुक्रवार पेठ येथे पूर्व दिशेला असणाऱ्या मंडईच्या आतील ब्रिटिश कालीन जुने लाकडी गाळ्यांना व मंडईच्या लाकडी छताला रात्री 12:30 वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली.

_MPC_DIR_MPU_II

अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्वरित कसबा सब स्टेशन व मध्यवर्ती अग्निशमन कंट्रोल रूम येथून तीन फायर गाड्या रवाना झाल्या व चारही बाजूने अगीवर तीन लाईन होजच्या करून पाण्याचा मारा केला व  त्वरित आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाने अत्यंत जलद कारवाई केल्या मुळे पुण्यातील एक एतिहासिक ठेवा नष्ट होता होता वाचला. सदरची कारवाई फायर ऑफिसर प्रदीप खेडेकर यांच्या नेतृत्वा खाली जवान अतुल मोहिते, प्रदीप पवार, मनीष बोबले, अझीम शेख, स्वप्नील टूले, सुधीर नवले या जावनांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment