Bank : बँकांसाठी होणार पाच दिवसांचा आठवडा ?

एमपीसी न्यूज : बँकांना पाच दिवसांचा आठवडा असावा याबाबतचा प्रस्ताव इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) अर्थ मंत्रालयाकडे सादर केला आहे.(Bank) अर्थ मंत्रालयाकडून या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जात आहे. त्यामुळे पुढील काळात बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा होण्याची दाट शक्यता आहे.

पाच दिवसांचा आठवडा होण्यासाठी इंडियन बँक असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्पलॉइज यांच्यामध्ये मागील काही काळापासून चर्चा सुरू आहे. बँकांना सध्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका सुरू असतात. पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना दररोज 40 मिनिटे अधिक काम करावे लागेल.

Hinjawadi : हिणवल्याच्या रागातून दोघांवर जीवघेणा हल्ला

पाच दिवसांचा आठवडा होण्याच्या संदर्भातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत.(Bank) अर्थ मंत्रालयाकडून या संदर्भात

लवकरच अधिसूचना काढण्याची शक्यता आहे.

 

मे महिन्यात अकरा दिवस बँका बंद

 

मे महिन्यामध्ये भारतातील बँकांना विविध कारणांमुळे 11 दिवस सुट्टी असणार आहे. हल्ली इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग असल्यामुळे प्रत्यक्ष बँका बंद असल्या तरी ग्राहकांना त्याचा फारसा त्रास होत नाही. त्यासोबतच एटीएम कार्डची सुविधा असल्यामुळे देखील आर्थिक देवाणघेवाण सोयीस्कर झाली आहे.(Bank) असे असले तरी अनेकांना इंटरनेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंग हाताळता येत नाही. त्यामुळे अशा खातेधारकांनी बँकांच्या सुट्ट्या लक्षात घेत आपली बँकेतील कामे करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.