Sangvi : एकाच गाडीतून आलेल्या मित्रावर गोळ्या झाडत केला खून

एमपीसी न्यूज – एकाच गाडीतून आलेल्या मित्रांनी एका मित्रावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रक्षक चौकात घडली.
सागर शिंदे (रा. जुनी सांगवी (Sangvi) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत सागर शिंदे आणि आरोपी एकाच कारमधून रक्षक चौकात आले. गाडीतच त्यांचा वाद झाला. आरोपींनी पिस्तुलातून सागर यांच्यावर गोळ्या झाडल्या.

त्यात सागर यांचा मृत्यू झाला. भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर आरोपी गाडीतून खाली उतरले. त्यांनी चौकात जाऊन एका दुचाकीस्वाराला अडवून त्याची दुचाकी घेऊन पळ काढला.
सागर याच्यावर सन 2013 मध्ये चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच वादातून हा प्रकार घडला असल्याचे म्हटले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.