PCMC : अग्निशामक विभागासाठी वॉटर कॅनन, ऍडव्हान्स रेस्क्यू वाहने खरेदी करणार

एमपीसी न्यूज – महापालिका अग्निशामक (PCMC) विभागाच्या वापराकरिता वॉटर कॅनन तीन, फायर टेंडर सहा आणि ऍडव्हान्स रेस्क्यू टेंडरसाठी दोन नग वाहने खरेदीच्या खर्चास तसेच महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या प्रभाग क्र. 2 सेक्टर क्र. 16, राजे शिवाजीनगर अग्निशमन केंद्रात फर्निचर व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत कॅलिग्राफी उद्यानांमध्ये भिंती रंगवण्याबाबत, व्हर्टिकल गार्डनसाठी प्लास्टिक पॉट स्टँन्डसह साहित्य पुरविणेबाबत, नर्सरीसाठी प्लास्टिक पॉट खरेदी करणेबाबत येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेचे प्रभाग क्र. 5 गवळी संत तुकाराम नगर व इत्यादी ठिकाणी रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली येथील 1442 सदनिकांच्या प्रकल्पातील किचनच्या खिडक्यांना एम. एस. ग्रील बसविणे, वाय. सी. एम. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक कामे करणे, नवजात अर्भक विभागाचे नुतनीकरण करणे, डॉक्टरांचे निवासस्थान नुतनीकरण व विद्युत विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Sangvi : एकाच गाडीतून आलेल्या मित्रावर गोळ्या झाडत केला खून

कायदा विभागाकडील विधी अधिकारी अभिमानाचे पद एकत्रित (PCMC) मानधनावर हंगामी स्वरूपात ६ महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरणे, प्रभाग क्र.25 ताथवडे परिसरातील जलनि:सारण नलिकांची व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच प्रभाग क्र. 28 पिंपळे सौदागर व प्रभागातील महापालिका इमारतींची स्थापत्य विषयक देखभाल व दुरूस्ती कामे करणे, प्रभाग क्र. 28 पिंपळे सौदागर तसेच प्रभाग क्र. 26 विशालनगर व प्रभागातील इतर परिसरातील फुटपाथ आणि पेव्हिंग ब्लॉकची देखभाल दुरूस्ती विषयक कामे, मध्यवर्ती औषध/साहित्य भांडार, वैद्यकीय भांडार, मनपा रुग्णालयाकरिता हॅन्ड पॅलेट ट्रक खरेदीबाबत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.