Chakan : शेतातील झाडे तोडल्याचा जाब विचारल्यावरून मारहाण

एमपीसी न्यूज – जमीन मालकाच्या संमतीशिवाय परस्पर जमीन सपाट केली. शेतातील झाडे तोडली. याचा जाब विचारल्यावरून जमीन मालकाला मारहाण केली. हा प्रकार शनिवारी (दि. 18) दुपारी साडेचारच्या सुमारास संतोषनगर येथे घडला.

संदीप सोपान कड (वय 37, रा. संतोषनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू मेहता, राजेश घुगे, गारगोटे (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप यांची संतोषनगर येथे जमीन आहे. वरील तीन आरोपींनी त्यांची जमीन जेसीबीच्या साहाय्याने सपाट केली. सपाट करण्यासाठी वापरलेली जेसीबी गारगोटे याची आहे. तर त्यावर राजेश चालक म्हणून काम करतो. तिघांनी मिळून संदीप यांच्या शेतात असलेली झाडे काढून टाकली. याचा जाब विचारण्यासाठी संदीप गेले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या आईसोबत अश्लील वर्तन केले. यावरून संदीप यांनी चाकण पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.