Pimpri : केरळ पूरग्रस्तांसाठी पिंपरी-चिंचवडमधून मदतीचा ट्रक रवाना

एमपीसी  न्यूज – केरळमध्ये चालू असलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून शेकडो लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. बेघर झालेल्यांची संख्‍या हजारोमध्ये आहे. ही सामाजिक बांधिलकी जपत कल्चरल असोसिएशन सांगवी पुणे यांच्यातर्फे पिंपरी-चिंचवड येथील सामाजिक संस्था व नागरिकांकडून गोळा केलेल्या मदतीतून पूरग्रस्तांसाठी अन्न कपडे व औषधांचा ट्रक केरळ साठी पाठवला आहे, अशी माहिती संस्थेचे प्रेसिडेंट एम. थॉमसन यांनी दिली. 

याप्रसंगी विशाल डोंगरे, टोनी थॉमस, सुरज बनसोडे, शिवकुमार गुप्ता, मोसिन गडकरी, हुसेन रंगवला,राज चाकणे, चेतन गौतम बेंद्रे आदी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या केरळाला अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या अगोदर अशाच मदतीचे दोन ट्रक केरळसाठी रवाना झाले आहेत. यासोबत अस्तित्व मंचाच्या कार्यकर्त्यांनी जमा केलेल्या मदत निधीमधून औषधे पाठवण्यात आली आहेत. ही मदत केरळमधील यलेपी, ठिरुवल्ल या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या लष्कर व एनजीओच्या माध्यमातून पूरग्रस्त लोकांना वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती कल्चरल असोसिएशन सांगवीच्या अध्यक्ष एम. थॉमसन यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.