Pune News : रक्ताचा तुडवडा कमी करण्यासाठी रक्तदान करत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन !

एमपीसी न्यूज : राज्यात रक्ताचा तुडवडा पडला असून जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन नुकतेच महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार आधार सेवा केंद्र व पुणे ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भव्य रक्तदान शिबिराचे शिवदर्शन बागेमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्ताचा तुडवडा कमी करण्यासाठी नागरिकांनी उत्फूर्तपणे रक्तदान करत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.

यामध्ये शिवदर्शन, सहकारनगर, पद्मावती, पर्वती दर्शन, तावरे कॉलनी आदी भागातून नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला साद देऊन सुमारे 113 हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले.

या शिबिराचे उद्घाटन पुणे शहराचे माजी उपमहापौर व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर , रमेश भंडारी, राजेंद्र बागुल, कपिल बागुल यांच्यासह आदर्श सेवा केंद्राचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

या प्रसंगी आधार सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हेमंत आबा बागुल मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सर्व जाती धर्मातील नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून आणले. त्याबद्दल रक्तदात्यांचे व पुणे ब्लड बँकेचे आभार मानतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.