Aalandi News : नदी स्वच्छता जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज – दि.8 जानेवारी रोजी सकाळी 8 वा. श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र देहू ,श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र आळंदी (Alandi News) अश्या स्वरूपात संत संगम भेट भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
पवित्र इंद्रायणी पात्राचे पुनरूज्जीवन करण्याच्या हेतूने इंद्रायणी मातेच्या दोन्ही तीरावर वसलेल्या गावांमध्ये व शहरांमध्ये नदी स्वच्छता जनजागृतीसाठी सायकल वारीच्या माध्यमातून प्रत्येक गावातील प्रशासकीय आधिकारी , सरपंच, नगराध्यक्ष , राजकीय,पदाधिकारी यांना भेटून जनजागरण मोहीम राबवली जाणार आहे.दि.8 जानेवारी रोजी सकाळी. 8 वा.या भव्य सायकल रॅलीचा श्री क्षेत्र आळंदी येथून प्रारंभ होणार असून श्री क्षेत्र देहू  ते परत श्री क्षेत्र आळंदी असा प्रवास होणार आहे.
या प्रवासात नदी प्रदूषणा बाबत प्लास्टिक कचरा ,जनावरे तसेच कपडे न धुणे , सांडपाणी शुद्ध करून सोडणे याबाबत जनजागृती (Alandi News)करण्यात येणार आहे.या रॅलीत परिसरातील संस्थांनी,नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा,अशी आयोजकांच्या द्वारे विनंती करण्यात आली आहे.

या संत संगम रॅलीस  श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान ,श्री संत तुकाराम महाराज संस्थान , आळंदी पोलीस स्टेशन,आळंदी नगरपरिषद, वारकरी शिक्षण संस्था,श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ,इंद्रायणीमाता परिसरातील सर्व सेवा भावी संस्था , आळंदी ग्रामस्थ (Alandi News) व भाविकांचे सहकार्य लाभणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.