Aalandi : माऊलींच्या पालखी सोहळ्यात तुळशीराम भोसले यांच्या बैलजोडीचा मान

एमपीसी न्यूज- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ( Aalandi ) चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीचा मान यंदाच्या वर्षी आळंदीतील भोसले  घराण्याला मिळाला आहे.बैलजोडी समितीच्या बैठकीला  (समिती अध्यक्ष) बबनराव कुऱ्हाडे पा., शिवाजीराव रानवडे पा.,नंदकुमार कुऱ्हाडे पा. ,विलास घुंडरे पा.,रमेश कुऱ्हाडे पा. ,रामचंद्र भोसले पा.,ज्ञानोबा वहिले पा. आदी सदस्य उपस्थित होते.

 

Bhosari News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

यावेळी तुळशीराम नारायण भोसले यांना बैलजोडी जुंपण्याचा मान देण्याचा ठराव सर्वानुमते (बहुमताने) मंजूर करण्यात आला.याबाबत माहिती समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पा., नंदकुमार कुऱ्हाडे पा. यांनी दिली.यावेळी देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व आळंदीतील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.