Pune : टपाल खात्याकडून श्री सदगुरू शंकर महाराजांचे विशेष टपाल पाकीट प्रकाशित

योगीराजांचा आणि त्यांच्या कार्याचा लौकिक जगभर

एमपीसी न्यूज – श्री सदगुरू शंकर महाराजांच्या 76 व्या समाधी सोहळ्या निमित्ताने (Pune ) भारत सरकारच्या टपाल खात्याकडून समारंभपूर्वक श्री सदगुरू शंकर महाराजांचे प्रकाशचित्र असलेले विशेष आवरण (टपाल पाकीट) वैशाख शुद्ध अष्टमी अर्थात काल लोकसभा खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते टपाल विभागाच्या पुणे क्षेत्राचे जनरल पोस्ट मास्टर आर. के. जायभाये आणि रिपन ड्यूलेट यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले.

Aalandi : माऊलींच्या पालखी सोहळ्यात तुळशीराम भोसले यांच्या बैलजोडीचा मान

पाकिटावर महाराजांची सुरेख प्रतिमा आणि त्या भोवती महाराजांशी संबधित त्रिशूळ, शंख, कमळ, बेलपत्र, कमंडलू, जपमाळ, गदा आणि चक्र या चिन्हांसह वटवृक्षाचे चित्र छापले आहे. शिवाय आजच्या या विशेष दिवशी कॅन्सलेशन क्याचेट देखील प्रकाशित झाले, त्यावर श्री शंकर महाराजांचे कृष्णधवल चित्र, शिवलिंग, बेलपत्र, त्रिशूळ-डमरू आणि भगवा ध्वज यांची चित्रे देखील प्रकाशित करण्यात आली. महत्वाचे म्हणजे महाराजांच्या समाधीची तिथी आणि तारीख या निमित्ताने शासकीय दस्तावेजात पहिल्यांदाच अधिकृतपणे अधोरेखित झाली.

याच प्रसंगी महाराजांच्या जीवनावरील माहिती पत्रकाचे अनावरण श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, सदर पत्रकाचे संकलन आणि संकल्पना ट्रस्टच्या विश्वस्तांची तसेच श्री सदगुरू शंकर महाराजांची महती आणि समाधी सोहळ्याची तिथी टपाल खात्याच्या माध्यमातून भारतभर पोहोचवण्या मागची संकल्पना आणि विशेष आवरणाचे रेखांकन सचिन पुणेकर यांचे होते.

कार्यक्रमास जेष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हास पवार, विशेष अतिथी म्हणून आमदार भिमराव तापकीर, आ. माधूरीताई मिसाळ, आ. सुनील कांबळे, विश्वस्त सुरेंद्र वाईकर, सतीश कोकाटे, पी. डी. पाटील, राजाभाऊ सूर्यवंशी, मिहीर कुलकर्णी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले आणि (Pune ) पर्यावरण शास्त्रज्ञ सचीन पुणेकर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.