AAP News: महापालिकेचे सेवानिवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचा आपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (AAP News) सेवानिवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी राजकीय इनिंग सुरू केली आहे. त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते पुणे येथे आज (बुधवारी) प्रवेश सोहळा झाला.

या वेळी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आप प्रवक्ते प्रकाश हगवणे, डॉ. अमर डोंगरे, सिताताई केंद्रे, डॉक्टर अभिजीत मोरे व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Khed Crime : भाडे तत्वावर चालवायला दिलेल्या गाडीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या चालकास अटक

दोन महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेतून डॉ.रॉय सेवानिवृत्त (AAP News) झाले. आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर ते कार्यरत होते. आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम पाहून प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये डॉ.रॉय यांनी प्रवेश केला आहे. डॉ. रॉय यांचा पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर संपर्क आहे. येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.