Pune News : सारसबागेत बेवारस बॅग, बॉम्बच्या अफवेने खळबळ

एमपीसी न्यूज : पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेत मंगळवारी सायंकाळी बेवारस बॅग आढळली असून त्यानंतर या बॅगेत बॉम्ब असल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. (Pune News) या अफेनंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करावे लागले. त्यानंतर या पथकाच्या जवानांनी संबंधित बॅगची तपासणी केली असता त्यात लॅपटॉप टिफिन आणि इतर साहित्य आढळले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

पुणे शहरात मागील दोन दिवस जी 20 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात होती. दरम्यान मंगळवारी सायंकाळी सारसबागेत बेवारस बॅग असल्याची माहिती एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला कळवली होती. त्यानंतर स्वारगेट पोलीस आणि बीडीडीएसचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने सर्व बागेतील संपूर्ण परिसर मोकळा करून संशयास्पद बॅगेची तपासणी केली. आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा विश्वास टाकली.

Pune News: पुण्यातील G-20 परिषदेत शहरातील पायाभूत सुविधा ते जगातील हवामान बदल या मुद्द्यांवर चर्चा

ही बॅग एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होती. यात लॅपटॉप आणि टिफिन आढळून आला. दरम्यान बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून मागील काही दिवसांपासून शहरातील (Pune News) वेगवेगळ्या भागाची नियमित तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी बॉम्ब किंवा इतर अफवा पसरवू नये असे आवाहन बीडीडीएस पथकाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर ढगे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.