पुण्यात पाच मोबाईल शॉपीमध्ये घरफोड्या करणाऱ्या आरोपीला बिहार मधून अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील पाच मोबाईल शॉपीमध्ये घरफोड्या करून लाखोंचा माल लंपास करणाऱ्या आरोपींना हडपसर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. चोरीचा माल विक्रीच्या उद्धेशाने बिहार मध्ये गेलेल्या आरोपीला पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन मुद्देमालासह अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी साहिल अनिल मोरे (वय 20 रा.शिवणे), संकेत प्रकाश निवगुणे (वय 22 रा.माळवाडी), लक्ष्मण आण्णा जाधव (वय 34 रा.कोथरुड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपर पोलीस ठाण्यात 23 ऑक्टोबर रोजी एक तक्रार दाखल झाली होती ज्यामध्ये उरळीदेवाची येथील न्यू साई या मोबाईलच्या दुकानातून 19 लाख रुपयांचे तब्बल 102 मोबाईल चोरीला गेले होते. यावरून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची कसून तपासणी केली. यावेळी यातील संशयती साहिल याला पोलिसांनी डुक्करखिंड येथून ताब्यात घेतला. त्याच्याकडे पोलीस कस्टडीत तपास केला असता त्याने त्याचा साथीदार संकेत चे नाव सांगितले. पोलिसांनी संकेत यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या साऱ्या मुख्य सुत्रधार हा लक्ष्णण जाधव असून तो सध्य़ा बिहार मधील छापरा जिल्ह्यात चोरीच्या मुद्देमालाची विलिहेवाट लावण्यासाठी गेल्याची शक्यता सांगितली. त्यानुसार पोलिसांनी थेट बिहार गाठलेव लक्ष्मण जाधव याला चोरीच्या 97 मोबाईलसह ताब्यात घेतले.तीनही आरोपी पोलीस कस्टडीत असून आरोपींनी हडपसर, कोंढवा, धायरी, चतुःश्रृंगी या भागात मोबाईलची दुकाने फोडल्याचे कबुल केले.चोरीचा माल जाधव हा त्याच्या आणकी एका साथीदाराला विकत होता. मोबाईल विकल्यानंतर त्याची 40 टक्के रक्कम ही आरोपींना मिळत होती.

Property Tax to PCMC : 7 महिन्यात केवळ 2 लाख 65 हजार मालमत्ताधारकांनी भरला कर

यावेळी पोलिसांनी चोरीचे 97 मोबाईल, कार, दुचाकी असा एकूण 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील मुख्य सुत्रधार लक्ष्मण जाधव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आत्तापर्यंत 14 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यामध्ये चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, खूनाचा प्रयत्न, खून असे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

ही कारवाई हडपस पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अमंलदार सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदिप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे,अतुल पंधरकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.