Kalewadi News : फुटपाथवरील पत्राशेड, टप-यांवर धडक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या धडक कारवाई पथकाने पिंपरीतील डिलक्स चौक ते काळेवाडी पूल रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पत्राशेड, टप-यांवर आज (गुरुवारी) धडक कारवाई करण्यात आली.

 

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, टप-यांवर धडक कारवाई सुरु केली आहे. मागील काही दिवसांपासून अतिक्रमणावर जोरदार कारवाई सुरु आहे. शहराच्या सर्वच भागातील अतिक्रमणावर कारवाई केली जात आहे. कारवाईमुळे फुटपाथ मोकळा श्वास घेवू लागले आहेत.

ग क्षेत्रीय कार्यालयाच्या धडक कारवाई पथकामार्फत प्रभाग क्रमांक 21 पिंपरीतील डिलक्स चौक ते काळेवाडी पूल रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या विनापरवाना 40 पत्राशेड, टप-यांवर कारवाई केली. टप-या जप्त केल्या. अंदाजे 4 हजार चौरस फुट क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.

जेसीबी, क्रेन, डंपर, मजूरांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, महापालिकेचे पोली, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.