Talegaon : महावितरणची कारवाई; 45 दिवसांपेक्षा जास्त थकीत बिल असलेल्या ग्राहकांचे विद्यूत कनेक्शन खंडित

उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे यांची माहिती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ज्या ग्राहकांनी ४५ दिवसांच्या पुढे विद्युत बिल भरले नाही त्या ग्राहकांचे विद्युत कनेक्शन खंडित करण्याची जोरदार कारवाई सुरू असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे यांनी दिली.

विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालय मुंबई येथून आलेल्या आदेशानुसार तळेगाव दाभाडे शहरात ४५ दिवसांच्या पुढे ज्या ग्राहकांनी विद्युत बिल अद्यापही भरले नाही त्या ग्राहकांची शोध मोहीम राबविण्यात आली आहे. या कारवाईत ७५० ग्राहकांचे विद्युत कनेक्शन तोडले असून ज्यांनी बिल भरले त्यांचे त्वरित विद्युत कनेक्शन जोडले आहे.

विद्युत ग्राहकांना वेळचे वेळी विद्युत बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. यात बिल वेळेत न भरणाऱ्या विद्युत ग्राहकांचे विद्युत कनेक्शन तोडले आहे. काहींनी विद्युत कनेक्शन घेतले असून अनेक महिने विद्युत बिल भरले नाही, अशा ग्राहकांची तारांबळ उडाली. ही मोहीम मावळ तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.