Mayuri’s Emotional Letter To Late Ashutosh: मयुरीने दिवंगत आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त लिहिले भावनिक पत्र

Actress Mayuri Deshmukh writes Emotional Letter To husband Late Ashutosh bhakre मला अर्ध्या वाटेत सोडल्याबद्दल मी तुझ्यावर चिडावं की जितका वेळ माझ्यासोबत होतास याबद्दल कृतज्ञ असावं? पण त्याने काय फरक पडतो'?

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी येते नाही तो मराठीतील आणखी एका युवा अभिनेत्याने गळफास घेऊन जीवन संपवले. अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरेने 29 जुलै रोजी नांदेड येथील राहत्या घरी आत्महत्या केली. गेल्या काही काळापासून आशुतोष नैराश्यातून जात होता, त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख ही आशुतोषची पत्नी आहे. मंगळवारी (दि.11) आशुतोषचा 32 वा वाढदिवस होता. मात्र त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी तोच या जगात नव्हता. या विचित्र परिस्थितीबद्दल व्यक्त होताना मयुरीने स्वतः केकचा एक फोटो शेअर केला आणि आपल्या भावनांना वाट करुन दिली.

‘आशुडा, तुझ्या वाढदिवशी सर्वोत्तम केक तयार करता यावा, केवळ यासाठी मी लॉकडाऊनच्या काळात 30 केक तयार केले. त्या सर्व 30 केक्सची पहिली चव तू चाखली होतीस. पण हा… 30 वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का? आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस’.

‘आम्हाला माहीत आहे की, तू उचललेले पाऊल भ्याडपणातून नाही, तर असहाय्यतेमुळेच होते. जे नैराश्यासोबत झालेल्या तुझ्या दीर्घकालीन संघर्षातून आले. पण गुणी बाळ माझं ते, आपण त्याला पराभूत करण्याच्या अगदी जवळ आलो होतो. आपण किती चांगलं काम करत होतो. थोडं आणखी परिश्रम घ्यायची गरज होती.

दररोज, प्रत्येक सेकंदाला, थोडासा जास्तीचा संयम, थोडेसे अधिक धैर्य आणि एक दीर्घ, निरोगी, आनंदी आयुष्य वाट पाहत होतं तुझी. आपली. मला अर्ध्या वाटेत सोडल्याबद्दल मी तुझ्यावर चिडावं की जितका वेळ माझ्यासोबत होतास याबद्दल कृतज्ञ असावं? पण त्याने काय फरक पडतो’?

‘तुझ्या आत्म्याचा शांततेने प्रवास व्हावा आणि देवदूतांनी तुला योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना आम्ही सतत करत आहोत. देवदूतांचे ऐक. आता नेहमीसारखा हट्टीपणा करु नकोस. मी, अभी, मम्मी, पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू आमच्यासोबत असताना आम्ही ते पुरेसे व्यक्त केले असावे, अशी आशा आहे. इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस, मी देखील तेच करेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’.

‘तुझीच, #बायकोतुझीनवसाची’ या वरकरणी संयत पण मनातून खूप असहाय्य असलेल्या शब्दात मयुरीने आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

तसेच याच निमित्ताने आशुतोषची आई अनुराधा भाकरे यांनीही सोशल मीडियावर एक विस्तृत पोस्ट लिहून आशुतोषसोबत नक्की काय घडलं होतं आणि तो कशाप्रकारे नैराश्याचा सामना करत होता, याकाळात त्याला मयुरी आणि संपूर्ण कुटुंबाची कशी साथ मिळाली हे सांगितले आहे.

सोबतच नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार, त्याकडे दुर्लक्ष करु नका. एकमेकांना मदत करा मानसिक आधार द्या, रुग्ण नक्कीच बरा होवू शकतो. या रुग्णांकडे सकारात्मकतेने पाहा अशी कळकळीची विनंतीदेखील केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.