NDTV : अदानी समूह विकत घेणार एनडीटीव्ही; 29.18 टक्के हिश्श्याचा व्यवहार पुर्ण

एमपीसी न्यूज – देशातील आघाडीच्या अदानी ग्रुप एनडीटिव्ही मिडीया ग्रुपचे 29.18 टक्के शेअर्स विकत घेणार आहे. त्याच्याबरोबर आणखी 26 टक्के शेअर्स खरेदी करण्याची खुली ऑफरही  कंपनीकडून देण्यात येणार आहे. अदानी ग्रुपने आपल्या अधिकृत निवेदनात ही माहीती दिली.

अदानी ग्रुपनं आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, अदानी ग्रुपची उपकंपनी असलेली एएमजी मीडिया नेटवर्क्स लि. न्यू दिल्ली टेलिव्हीजन लिमिटेडमधील 21.98 टक्के हिस्सा विकत घेणार आहे. तसेच उर्वरीत 26 टक्के हिस्सा विकत घेण्याची ऑफरही अदानी ग्रुपने एनडीटीव्हीला दिली आहे.यासाठी 493 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. ज्याच्या एका शेअरची किंमत 294 रुपये असेल. या व्यवहारामुळे एनडीटीव्हीनं शेअर बाजारात 5 टक्के उसळी मारलेली पाहायला मिळाली. ज्यामुळे त्याची किंमत 376.55 रुपयांवर पोहोचली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.