Sharad Pawar : हाच महिलांचा सन्मान का? शरद पवार यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल!

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘हाच महिलांचा सन्मान आहे का?’ असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली आहे. त्यांनी गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मोदी सरकारची कानउघडणी केली आहे.

Pune News : राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन

शरद पवार म्हणाले, कि 15 ऑगस्टचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांनी भाषण ऐकले. त्यात त्यांनी महिलांविषयी खूप चांगलं म्हंटले आहे. पण एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. हाच महिलांचा सन्मान आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते मंगळवारी (23 ऑगस्ट) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.