AFMC : सशस्त्र बल मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी मेजर जनरल गिरिराज सिंह

एमपीसी न्यूज – पुणे येथील सशस्त्र बल (AFMC) वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) च्या अधिष्ठाता पदी मेजर जनरल गिरीराज सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांची उपकमांडंट म्हणून देखील नियुक्ती झाली आहे. गिरीराज सिंह हे एएफएमसीचे माजी विद्यार्थी आहेत.

सन 1989च्या बॅचचे ते विद्यार्थी आहेत. त्यांनी वैद्यकशास्त्रातील एम डी पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते रेडीओ डायग्नोसिसमध्ये डीएनबी आहेत. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्ली येथून क्रोस-सेक्शनल इमेजिंगमध्ये फेलोशिप मिळाली आहे.

सिएरा लिओनमधील युनायटेड नेशन्स मिशन (UNAMSIL) यासह भारतीय सैन्याच्या विविध रुग्णालयांमध्ये रेडीओलॉजिस्ट म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी आर्मी हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख आणि सल्लागार (रेडीओलॉजी) यासह प्रतिष्ठित पदावर (AFMC) काम केले आहे. लेफ्टनंट जनरल गिरीराज सिंह यांना त्यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल सन 2011 मध्ये लष्कराचे उप प्रमुख म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

आता ते आगरा सैन्य रुग्णालयाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.