Pune : पवार यांच्यावर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादीतर्फे राज्यभर आंदोलने

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या (बुधवारी) राज्यभर निदर्शने, रास्ता-रोको अशी आंदोलने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बारामतीकरांनी उद्या ‘बारामती बंद’चे आवाहन केले आहे.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या (बुधवारी) दुपारी साडेबारा वाजता पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध आंदोलन आयोजित केले आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.