Pune : ‘अॅग्रो टुरिझम विश्व’ला ‘बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप’ ऑफ द इयर पुरस्कार

अर्थसंकेत प्रस्तुत 'डिजिटल इंडिया २०२० कॉनक्लेव्ह' कार्यक्रमात पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – अर्थसंकेत प्रस्तुत ‘डिजिटल इंडिया २०२० कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात पुण्यातील ‘अॅग्रो टुरिझम विश्व’, www.agrotourismvishwa.com या स्टार्टअप कंपनीला ‘बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप’ ऑफ द इयर या पुरस्काराने मुबंईत गौरविण्यात आले. मुंबईतील महाराष्ट्र कॉमर्स ऑफ चेंबर्स येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कंपनीच्या वतीने संस्थापक गणेश चप्पलवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विविध क्षेत्रातील डिजिटल इनोव्हेटिव स्टार्टअप सुरू केलेल्या कंपनीला यावेळी पुरस्काराने सन्मानीत केले गेले.

महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन, कृषी केंद्रांची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देणे. फेसबुक, लिंकडिन, इन्स्टाग्राम, यु ट्यूब, व्हॉट्स अप, इ मेल यांसारख्या माध्यमातून त्यांची जाहिराती, प्रमोट करणे, मार्केटिंग करणे थोडक्यात काय तर कृषी पर्यटन केंद्रांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी पर्यटन विश्वच्या वतीने करण्यात येते. या डिजिटल कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी अर्थसंकेतचे संस्थापक अमित बागवे यांनी डिजिटल इंडिया २०२० कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमात यावेळी तंत्रज्ञानाची संबंधित व्यवसाय करणाऱ्या विविध उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप’ या पुरस्काराने अनेकांना पुरस्कार देण्यात आले.

यावेळी मी तेजस रेळेकर याने इंटरनेट ऑफ थिंग्स या विषयावर मार्गदर्शन केले व जग कशा प्रकारे बदलले आहे व यापुढे कसे बदलेल याबद्दल माहिती सहज आणि सोप्या भाषेत दिली. कार्यक्रमाचे कि नोट स्पीकर एडव्हान्टेजचे प्रमुख नयन भेडा यांनी उपस्थितांचे डोळे उघडणारे विवेचन केले व जागतिक स्तरावर तंत्रज्ञानात होत असेलेले बदल व त्याचा आपल्या आयुष्यावर होत असलेला व पुढे होणार परिणाम जाणवून दिला. बदलत्या तंत्रज्ञानामुळे नोकरी व व्यवसायावर होत असेल परिणाम त्यांनी सगळ्यांना दाखवून दिले. अर्थसंकेतचे ब्रँड अँकर किरण खोत यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत कार्यक्रमात धमाल आणली व उपस्थितांना कार्यक्रमात गुंतवून ठेवले. अर्थसंकेतच्यासह संस्थापक रचना बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.