Air India : एअर इंडियाची मालकी टाटाकडे जाणार या वृत्ताचे सरकारकडून खंडन

एमपीसी न्यूज – टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावत एअर इंडियाची मालकी जिंकल्याची वृत्त समोर आले होते. दरम्यान, या वृत्ताचे सरकारकडून खंडन करण्यात आले असून अशा आशयाचे प्रसारित होणारे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

पार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) ने याबाबत ट्विट करत वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘एअर इंडियाबाबत प्रसारमाध्यमात प्रसारित करण्यात आलेलं वृत्त चुकीचे आहे. याबाबत होणारा निर्णय योग्यवेळी प्रसारमाध्यमांना कळविला जाईल असे DIPAM ने ट्विट केले आहे.

एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने 1932 मध्ये केली होती. टाटा समूहाचे जेआरडी टाटा हे त्याचे संस्थापक होते. 1938 पर्यंत कंपनीने देशांतर्गत उड्डाणे सुरू केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ती एक सरकारी कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1953 साली भारत सरकारने ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.