Ajit pawar : दस का बीस करणाऱ्यांना सोडणार नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या(Ajit pawar) पुढाकाराने ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथे उभारलेल्या प्रकल्पांतील लाभार्थी निश्चित करण्यासाठीची संगणकीय सोडत पारदर्शकपणे काढली आहे.

तुम्ही अगदी माझ्याकडे आले अन् म्हणाले दादा माझी चिठ्ठी काढा (Ajit pawar)तर ते मला ही जमणार नाही. मलाच काय तर कोणाच्याच हातात हे नाही. नाहीतर काही शहाणे असतात, जे म्हणतात मी घर मिळवून देतो. असले कोणतेही एजंट प्रशासनाने नेमलेले नसतात. अगदी कोणाचे पीए असतील त्यांच्यावर ही विश्वास ठेवू नका. नाहीतर दस का बीसचे प्रकार घडतात.

आता नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळंच तुमचं स्वप्न पूर्ण झाल, असे म्हणून ते पैशांची लुबाडणूक करतात. अशा शहाण्यांना मी सरळ करतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Pune : राज्यात 26 जानेवारी पर्यंत गारठा राहणार कायम

महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथे उभारलेल्या प्रकल्पातील 938 सदनिकांची सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड येथे पार पडली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे उपस्थित होते.

सोडत पारदर्शक आहे. एकाही माणसाचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे गैरप्रकार होण्याची कोणतीही संधी नाही. कोणताही दलाल महापालिकेने नेमला नाही. नंबर काढून देतो म्हणणाऱ्यांची तक्रार करा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल असे सांगत अजित पवार म्हणाले की, एक किंवा दोन अपत्यावर थांबा, तेवढे मात्र नक्की करा. झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. याप्रमाणे लोकसंख्या वाढल्यास ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घरे बांधून देऊ शकत नाही.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.