Alandi : श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त आळंदीमध्ये उत्साहाचे वातावरण

एमपीसी न्यूज -अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात(Alandi) संपन्न होत आहे.याच पार्श्वभूमीवर आळंदी शहरात सकल हिंदू  समाज समस्त ग्रामस्थ व वारकरी  समाज आळंदी देवाची यांच्या वतीने भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.शोभा यात्रे निमित्त आळंदी शहर भगव्या वस्त्रांनी सजवण्यात आले आहे. 
शोभा  यात्रा ही गोपाळ कृष्ण मंदिर गोपाळपुरा – चाकण चौकवडगांव चौक-मरकळ चौक- नगरपरिषद चौक अशी मार्गक्रमण करत महाद्वार चौक येथे या शोभा यात्रेचा समारोप होणार आहे.

जय गणेश ग्रुप , जय गणेश प्रतिष्ठाण व समस्त (Alandi)आळंदीकर यांच्या तर्फे दि.22 रोजी जय गणेश मंदिरात महाआरती होणार असून प्रसाद वाटप होणार आहे.श्री राम मंदिरातसुद्धा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच माऊलीं पार्कच्या बाल गोपाळांमध्ये उत्साह दिसून येत आहे. भगव्या पताकांनी तेथील परिसर सजवण्याचे कार्य करताना ते दिसून येत होते.
  22 जानेवारी रोजी श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त माऊली पार्क मित्र मंडळाच्या वतीने प्रसादाचे येथे सुद्धा वाटप होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.