Akurdi : रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

एमपीसी न्यूज – दोन रिक्षाचालकांनी मिळून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 29) रात्री आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकात घडली.

पोलीस शिपाई लक्ष्मण छगन कोल्हे (वय 31) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ऑटो रिक्षा (एम एच 14 / सी यु 2739) वरील चालक आणि एका ओळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई लक्ष्मण कोल्हे निगडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते गुरुवारी रात्री आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपींनी संगणमत करून त्यांच्याशी हुज्जत घातली. पोलीस शिपाई कोल्हे यांना वाहतूक नियमन करण्याच्या कामापासून परावृत्त करत आरोपींनी कोल्हे यांना शिवीगाळ आणि हाताने मारहाण केली. आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.