Chinchwad : मोरया गोसावी मंदिर परिसरातील दुकानात चोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे ग्रामदैवत असलेल्या मोरया गोसावी मंदिर परिसरातील एका जनरल स्टोअर्समध्ये चोरी झाली. चोरट्यांनी दुकानातून तांबे, पितळ व पांढऱ्या धातूच्या मूर्ती तसेच रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी गुरुवारी (दि. 29) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन राजेंद्र छाजेड (वय 36, रा. मोरया गणपती मंदिर चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांचे मोरया गोसावी मंदिर परिसरात स्वानंद जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. 10 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता सचिन यांनी त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे मागील बाजूचे सिमेंटचे पत्रे फोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून तांबे, पितळ व पांढऱ्या धातूच्या मूर्ती, वस्तू व रोख रक्कम असा एकूण एकूण 89 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 11 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.