Akurdi : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांचे कोरोनामुळे निधन

Former NCP corporator Eknath Thorat dies due to corona ; आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांचे आज (शुक्रवारी) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

एकनाथ थोरात राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. 2007 मध्ये राष्ट्रवादीकडून ते महापालिकेत निवडून आले होते. त्यांनी कृष्णानगर भागाचे नेतृत्व केले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून ते दुग्धव्यावसायात कार्यरत होते.

आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर आकुर्डीतील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सायंकाळी त्यांचे निधन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.