Akurdi : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे अडीच हजार विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी

हिमोग्लोबिन वाढीसाठी मोफत औषधोपचार देणार

पंधरा हजार विद्यार्थिनींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे ‘सुकन्या प्रकल्पा’अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमधील विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी केली जात आहे. आजपर्यंत अडीचहजारविद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी केली आहे. त्यामध्ये प्रमाणापेक्षा 60 टक्के विद्यार्थिनींमध्ये 10 च्या कमी तर 40 टक्के विद्यार्थिनींमध्ये 8 च्या कमी हिमोग्लोबिन असल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थिनींना हिमोग्लोबिन वाढीसाठी मोफत औषधे दिले जाणार आहेत. पंधरा हजार विद्यार्थिनींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे, रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल यांनी सांगितले.

जिग्नेश आगरवाल म्हणाले, “सुदृढ आरोग्यासाठी रक्तात विशिष्ट प्रमाणात हिमोग्लोबिन असणे आवश्यक असते. त्यासाठी विद्यार्थिनींची रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे ‘सुकन्या प्रकल्पाअंतर्गत’ तपासणी केली जात आहे. 1 जुलैपासून शहरातील शाळेतील विद्यार्थिनींची तपासणी केली जात आहे. पिंपरीतील कन्या शाळा, आकुर्डीतील गोदावरी, डांगे चौकातील खिंवसरा पाटील, प्रेरणा विद्यालय आणि निगडी, प्राधिकरणातील विद्यानंद भवन येथील विद्यार्थिनींची तपासणी केली आहे. आजपर्यंत अडीचहजार विद्यार्थीनींची हिमोग्लोबिन तपासणी केली आहे. तर, 250 शिक्षकांची देखील तपासणी करण्यात आली आहे”

त्यामध्ये 60 टक्के विद्यार्थिनींमध्ये 10 च्या तर 40 टक्के विद्यार्थिनींमध्ये 8 च्या कमी हिमोग्लोबिनचे प्रमाण आहे. सरासरीपेक्षा हे प्रमाण कमी आहे. या विद्यार्थिनींना हिमोग्लोबिन वाढीसाठी तीन महिने मोफत औषधे दिले जाणार आहेत. 10 च्या कमी हिमोग्लोबिनचे प्रमाण असलेल्या सर्व विद्यार्थिनींना मोफत औषधे दिले जाणार आहेत. वर्षभर सुकन्या प्रकल्प सुरु राहणार असून 15 हजार विद्यार्थिनींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. याबाबत पालकांची बैठक घेतली असून हिमोग्लोबिनविषयी जनजागृती केली जात असल्याचे जिग्नेश आगरवाल यांनी सांगितले. प्रकल्प अधिकारी गौरव शर्मा यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

सुदृढ आरोग्यासाठी रक्तात विशिष्ट प्रमाणात हिमोग्लोबिन असणे आवश्यक असते. पुरुषांमध्ये 14 ते 16 ग्रॅम प्रति डेसिलिटर तर महिलांमध्ये 12 ते 14 ग्रॅम प्रति डेसिलिटर हिमोग्लोबिन असणे प्रकृती ठणठणीत असल्याचे लक्षण मानले जाते, असेही आगरवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.