Alandi: आळंदीतून हजारो मराठा बांधवासाठी शिदोरी

एमपीसी न्यूज-मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लाखो (Alandi)बांधवासोबत मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी पायी चालत निघाले आहेत. त्यांच्या या कार्यास सहभागी होण्यासाठी ज्याप्रमाणे माऊली वारकरी बांधवांना आपण मधुकरी देतो.

 

तसेच माता भगिनी शिदोरी देऊन सोडतात.त्याचप्रमाणे आपल्या बांधवांना आपल्या (Alandi)घरून शक्य होईल तेवढ्या भाकरी चपाती  शिदोरी म्हणून द्यावी.असे आवाहन समस्त ग्रामस्थ आळंदीकर ,केळगाव ग्रामस्थ ,च-होली ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थांनी केले होते.

 

Mp Shrirang Barne : मावळमध्ये विकास कामांचा धडाका, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते साडे एकविस कोटींच्या कामाचे भूमिपूजन

 त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत  आळंदीसह परिसरातील अनेक नागरिकांनी( चटणी,भाकरी व भाजीचे )अन्नदान केले.तसेच काही नागरिकांनी बिस्कीट पुडे बॉक्स ,मुरमुरे फरसाण, बिसलेरी बॉक्स इ.पदार्थ बांधवांसाठी दिले आहेत.  आज दि.24 रोजी आळंदी येथील माहेश्वरी भक्त निवास येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मुबंईस निघालेल्या(खराडी बायपास येथून आळंदीत ) आलेल्या हजारो मराठा बांधवांसाठी अन्नदान  करण्यात आले.

तसेच मराठा बांधवां करिता सुके अन्न पदार्थ,पाणी याची सेवा पोचवण्यात येणार आहे.आळंदी च-होली मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोफत औषध वाटप सुविधा करण्यात आली आहे.सकल मराठा समाज आळंदी देवाची सर्कल यांचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.