Alandi : आळंदीजवळील सोळू गावातील आगीत 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी

एमपीसी न्यूज – काल  सायंकाळी 05.09 च्या सुमारास सोळू ( Alandi) आळंदी मरकळ रोड (खेड) येथील स्पेसिपिक आलोय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये (Alandi Fire News) आग लागली.या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रथमदर्शनी ही आग ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटांमुळे झाल्याचे समोर आले होते. परंतु, येथील ट्रान्सफॉर्मर बंद असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. तरीही आजूबाजूच्या गावात या आगीमुळे फार नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 

Today’s Horoscope 09 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या आगीत संतोष त्र्यंबक माने, (वय-50 वर्षे,  आळंदी, पुणे)  व  एका अनोळखी इसमाचा (पुरुष) मृत्यू झाला असून अब्दुल सलम खान – रा. कुदळवाडी, चिखली, पुणे बकुळ सिद्धार्थनगर, मूळ  रा. उत्तप्रदेश)   , दिनेश रामकिसन मौर्य   ( वय-20 वर्षे, वा. सोडू, ताखे मुळ रा. कुटा बजार, कलपुरा,  ),  रामचंद्र मारुती निंबाळकर,  ( 21  बर्ष, रा. सोडू, ),  मोनु गौतम ( रा. कुदळवाडी, चिखली)  , बसवराज तमभा बनसोडे ( वय  50 )  हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर ससून रुग्णालयात  उपचार सुरु ( Alandi)  आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.