Alandi : इंद्रायणीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीत एका (Alandi) महिलेचा मृतदेह आढळला. ही घटना आळंदी येथे गुरुवारी (दि. 24) सायंकाळी उघडकीस आली.

CME : ‘सुविधा पार्क’ च्या रस्त्याला संरक्षण मंत्रालयाचा ‘हिरवा कंदिल’

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मयत महिलेचे वय अंदाजे 45 वर्ष असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाही.

शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मयत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत मृतदेह वाहून आला असावा, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. आळंदी पोलीस तपास करीत (Alandi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.