Alandi Crime News : रस्त्याच्या कडेला सोडून तीन दिवसांच्या बाळाचा परित्याग

एमपीसी न्यूज – अवघ्या तीन दिवसांच्या बाळाला अज्ञातांनी रस्त्याच्या बाजूला सोडून त्याचा परित्याग केला. ही घटना एक ऑगस्ट रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास धानोरी फाटा, मरकळ रोड, आळंदी येथे उघडकीस आली.

देवेशनाथ महेशनाथ चौहान (वय 20, रा. धानोरी फाटा, मरकळ रोड, आळंदी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 5) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी फाटा, मरकळ रोड येथे शिव इंजीनियरिंग या कंपनी समोरील रस्त्याच्या बाजूला अज्ञातांनी दोन ते तीन दिवस वय असलेल्या पुरुष जातीच्या बाळाला सोडून दिले. त्या बाळाचे पालनपोषण व सांभाळ करण्याचे कर्तव्य असताना अज्ञातांनी त्याचा पूर्णपणे परित्याग केला. बाळाला रस्त्याच्या कडेला सोडून अज्ञात आरोपी निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.