Alandi :गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या तयारीची कामे अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज -आळंदी येथे गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त (Alandi )गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत (चाकण चौक )वारकरी शिक्षण संस्थेसमोर याचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने तेथील आकर्षक सजावट व मंडप,सभा मंडप व्यवस्था, विद्युत व्यवस्था,परिसरातील स्वच्छता ,यज्ञ विधी साठी कुटी अशी विविध कामे अंतिम टप्प्यात आली आहे.

4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी गीताभक्ती अमृत महोत्सव निमित्ताने कार्यक्रम:-

4 फेब्रुवारी रोजी संत ज्ञानेश्वर समाधी अभिषेक 7 वा.,वारकरी (Alandi )सत्कार, यज्ञविधी शुभारंभ(10 ते 1) , सायंकाळी 4:30 ते 6:30 ह भ प संदीपन महाराज शिंदे ,रात्री 8:30 ते 10 ह भ प भास्करगिरी महाराज कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा. शोभा यात्रा ,सकाळी 10 ते 11:30 वा.वेदघोष व अमृत महोत्सवाचा शुभारंभ सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते,सकाळी 11:30 ते दु.1:30 श्रीमदभागवत कथारंभ(राजेंद्रदास महाराज),सायंकाळी 4:30 वा. ते 6:30 वा.बंडातात्या कराडकर कीर्तन, रात्री 8:30 ते रात्री 10 वा.चंद्रशेखर महाराज देगलूरकर कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

6 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा. चिरंजीव पूजन व हरिपाठ ,सकाळी 10 वा. ते दु.1 वा. श्रीमदभागवत कथा,दुपारी 3 ते 5 वेदशास्त्र संवाद ,दुपारी 3:30 ते सायंकाळी 7 वा.संतपूजन समारोह,रात्री 8: 30 ते 10 ह भ प चैतन्य महाराज देगूलकर कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा.
ज्ञानेश्वरोपासना(इंद्रायणी घाट),सकाळी 10 ते दुपारी 1 श्रीमदभागवत गीता,दुपारी 3 ते 5 वेदशास्त्र संवाद ,सायंकाळी 5 ते 7 मातृशक्ती संम्मेलन ,रात्री 8:30 ते 10 भारतमाता आरती(बाबा सत्यनारायण मौर्य) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Shirgaon : गावठी दारू निर्मिती प्रकरणी महिलेवर गुन्हा, 4 लाख रुपयांचे रसायन जप्त

8 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा.ज्ञानेश्वरोपासना(इंद्रायणी घाट),सकाळी 10 ते 1 श्रीमदभागवत कथा,दुपारी 3 ते 5 वेदशास्त्र संवाद ,सायंकाळी 5 ते 7 राष्ट्भक्ती संम्मेलन, रात्री ह भ प पांडुरंग महाराज घुले कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

9फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा. ज्ञानेश्वरोपासना (इंद्रायणी घाट),सकाळी 10 ते 1 श्रीमदभागवत कथा,दुपारी 3 ते 5 वेदशास्त्र संवाद,सायंकाळी 5 ते 7 भक्तिरस गान(पूज्य गोवत्स राधाकृष्ण महाराज),रात्री 8 ते 10 महानाट्य-यह पुण्य प्रवाह हमारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा.आळंदी प्रदक्षिणा, सकाळी 10 ते 1 श्रीमदभागवत कथा,सायंकाळी 4:30 ते 6:30 मृदुंगनाद ,गीतापठण(इंद्रायणी घाट),रात्री 8 ते 10 महानाट्य-रामायण(निर्मिती -गीता परिवार,प्रस्तुती-ध्रुव ग्लोबल स्कुल ,पुणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

फेब्रुवारी 11 रोजी सकाळी 11 ते दु.1 पर्यंत आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
गीताभक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमात देशातून अनेक महंत, संताचे व विविध मान्यवरांचे आगमन येथे होणार आहे. तसेच अनेक व्ही आय पी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.