Alandi Navratri : आळंदीमध्ये नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा

एमपीसी न्यूज : आळंदी येथे नवरात्र उत्सव 2022 हा (Alandi Navratri) जल्लोषात साजरा होत आहे. नवरात्र उत्सवानिमित्त चावडी चौकात राजे शिवछत्रपती मित्र मंडळाने बास्केट बॉल, बोरी स्पर्धा, संगीत खुर्ची, रिंग फेकणे, ग्लास थ्रो, लिंबू चमचा, बॉल पासिंग, लंगडी, हंडीफोड,फॅन्सी ड्रेस,फॅशन शो, डान्स, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेसह दररोज रात्री दांडियाचे आयोजन केले आहे.

शिवप्रतिष्ठाण ग्रुपने तुळजा भवानी मंदिरासमोर लिंबू स्पर्धा, संगीत खुर्ची, स्लो सायकल रेस, भोंडला, जादूगराचा खेळ, होम मिनिस्टर, ऑर्किस्ट्रा असे विविध खेळ व कार्यक्रमासह दररोज रात्री दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसत्ता ग्रुपने ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मैदानात भव्य दांडियाचे आयोजन केले आहे. ते पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी मोठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वडगांव रस्ता व आळंदी ग्रामीण भागात ही दांडियाचे अयोजन करण्यात आले आहे. दांडिया सह विविध कार्यक्रम, खेळ पाहण्यासाठी नागरिक याठिकाणी रात्री मोठी गर्दी करत आहेत.

Today’s Horoscope 28 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.